रिलायंस देणार जगातील स्वस्त व मस्त स्मार्टफोन

२०२१ च्या वार्षिक सभेत रिलायंसचे मालक मुकेश अंबानी यांनी रिलायंस लवकरच जगातील सर्वात स्वस्त व मस्त स्मार्टफोन भारतीयांना  देणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे भारतातील सुमारे ३० कोटी, २- जी  मोबाईल धारक ४- जी  स्मार्टफोन  वापरायला सुरवात करतील असे म्हटले आहे. हा स्मार्टफोन  रिलायंस व गुगल या दोन कंपन्यांनी  संयुक्तपणे तयार केला असून लवकरच तो बाजारात येईल व भारतात डिजिटल क्रांतीला एक निर्णायक वळण मिळेल असे त्यांनी म्हटले आहे. या जिओ फोन नेक्स्ट स्मार्टफोनमुळे लाखो भारतीयांना प्रथमच इन्टरनेट चा अनुभव घेता येणार आहे.

आम्ही  भारतीयांसाठी त्यांच्या भाषेत सर्व प्रकारची माहिती मिळवून देणे, भारतीयांच्या  विविध गरजांसाठी नवीन उत्पादने व सेवा तयार करणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाने भारतीय व्यवसाय सक्षम बनविणे या उद्देशाने हा स्मार्टफोन आम्ही संयुक्तपणे बनविला असल्याचे गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी म्हटले आहे.

किती किंमत असेल?

जिओ फोन नेक्स्ट स्मार्टफोनची किंमत अजून जाहीर झाली नसली तरी ती २५०० रुपये ते ५००० रुपयांच्या दरम्यान असणार आहे. त्यामुळे हा फोन जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन ठरणार आहे.

जिओ फोन नेक्स्ट स्मार्टफोन  कधी पासून मिळेल?

रिलायंस कंपनीच्या झालेल्या वार्षिक सभेत मुकेश अंबानी यांनी हा जिओ फोन नेक्स्ट हा स्मार्टफोन दिनांक १० सप्टेंबर २०२१ पासून म्हणजे येणाऱ्या गणेश चतुर्थी पासून उपलब्ध होईल असे जाहीर केले आहे.

जिओ फोन नेक्स्ट ची वैशिष्ट्ये काय असतील?

  • जिओ फोन नेक्स्ट स्मार्टफोन हा  ४-जी तंत्रज्ञानावर चालणार आहे.
  • जिओ फोन नेक्स्ट स्मार्टफोन अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम वर चालेल.

३. या फोन मध्ये व्हॉईस असिस्टंट  (आवाज सहाय्यक )असेल.

४. जिओ फोन नेक्स्ट स्मार्टफोनमध्ये स्क्रीन टेक्स्ट (मजकूर) वाचण्याचा आवाज जोरात असेल.

५. जिओ फोन नेक्स्ट स्मार्टफोनमध्ये भारतातील तसेच जगातील  भाषेत भाषांतर करता येईल.

६. जिओ फोन नेक्स्ट स्मार्टफोनमध्ये  ए.आर. फिल्टरसह उच्च गुणवत्तेचा स्मार्ट कॅमेरा असणार आहे. त्यामुळे उत्कृष्ट फोटो आणि व्हिडिओ तयार करता येतील. रात्रीच्या वेळी आणि कमी प्रकाशात काढलेले  फोटो एच.डी.आर. मोडमध्ये चांगल्या गुणवत्तेत दिसतील.

७. जिओ फोन नेक्स्ट स्मार्टफोन जगातील सर्वात स्वस्त  स्मार्टफोन असेल.

८.  जियो स्मार्टफोन नेक्स्ट  गूगल आणि जिओ या दोन कंपन्यांनी संयुक्तपणे विकसित केला आहे.

९. जिओ फोन नेक्स्ट स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमची  ऑप्टिमाइझ केलेली आवृत्ती असेल, जी विशेषत: भारतीय बाजारासाठी जिओ आणि गुगलने एकत्रितपणे विकसित केली आहे.

१०. जिओ फोन नेक्स्ट स्मार्टफोनमध्ये अ‍ॅन्ड्रॉइड प्ले स्टोअर असणार असून वापरकर्त्याला जगातील सर्व अप्लिकेशन वापरता येणार आहेत.

दूरसंचार बाजारपेठेतील स्थिती आणखी मजबूत करण्यासाठी रिलायन्सने अतिरिक्त स्पेक्ट्रम मिळविण्यासाठी ५७१२३ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आणि या गुंतवणूकीमुळे  २० कोटी  ग्राहकांची संख्या वाढण्याची क्षमता निर्माण झाली आहे.  येणाऱ्या काही महिन्यात रिलायंस  कंपनी भारतात ५ – जी सेवा सुद्धा उपलब्ध करून देणार आहे.

भारतीय बाजारपेठेत येणाऱ्या कालावधीत  Xiaomi, Samsung  व Realme या  परदेशी कंपन्यांना चांगलीच टक्कर Reliance कंपनी देणार आहे हे मात्र निश्चित.

Leave a Reply

Your email address will not be published.