महाराष्ट्र लोकसेवा आयोग – विविध स्पर्धापरीक्षा

– ज्ञानेश्वर मा. तिडके

  BE (Mechanical), MA (History)

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)दरवर्षी विविध पदांसाठी स्पर्धापरीक्षांचे आयोजन करत असते. जवळपास सर्वपरीक्षांचे स्वरूप सारखेच आहे – पूर्वपरीक्षा, मुख्यपरीक्षा आणि मुलाखत. काही परीक्षांना शेवटचा मुलाखतीचा टप्पा नसतो;जसे कि पोलीस उपनिरीक्षक. या पदासाठी मुलाखती ऐवजी शारीरिक चाचणी घेतली जाते. या लेखाद्वारे आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे स्वरूप,त्यासाठी लागणारी पात्रता, अभ्यासक्रम, किमान वय आणि वयोमर्यादा इत्यादी बाबींवर लक्ष केंद्रित करणारआहोत.

. राज्यसेवा परीक्षा

जवळ पास सर्वांना माहित असलेली आणि “एमपीएससी परीक्षा” म्हणून सर्वत्र ओळखली जाणारी ती हीच राज्यसेवापरीक्षा. या परीक्षेचे तीन टप्पे असतात – पूर्वपरीक्षा, मुख्यपरीक्षा आणि मुलाखत.

) पूर्वपरीक्षा

पात्रता१)भारतीय नागरिक – महाराष्ट्राचा अधिवास

           २)मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.पदवीच्या शेवटच्या वर्षात असताना सुद्धा

परीक्षा देता येते.

           ३)वयोमर्यादा–२०१९ च्या जाहिरातीनुसार.

दरवर्षी साधारण एप्रिल महिन्यात पूर्वपरीक्षा घेतली जाते. या मध्ये दोन पेपर असतात. पेपर – १ असतो सामान्यअध्ययनचा (General Studies) आणि पेपर – २ असतो CSATचा (Civil Services Aptitude Test). दोनही पेपर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रकारचे असतात.

पेपर१:-एकूण प्रश्न – १००, एकूण गुण – २००, वेळ – २ तास

अभ्यासक्रम – भारतीय इतिहास,  जगाचा आणि भारताचा भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था, राज्यशास्त्र व

भारतीय राज्यघटना, पर्यावरण, सामान्यविज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान आणि चालू घडामोडी.

पेपर २:-एकूण प्रश्न – ८०, एकूण गुण – २००, वेळ – २ तास. प्रत्येक प्रश्नाला २.५ (अडीच) गुण.

अभ्यासक्रम – अंकगणित (Basic Numeracy), तर्क व अनुमान (Logical Reasonig), बुद्धिमत्ता

(Mental Ability), आकलन(Comprehension) आणि PSDM- Problem Solving &

Decision Making.

पूर्व परीक्षेचे एकूण गुण दोन्ही पेपरचे गुण  एकत्र करून काढले जातात. २०२० पासून सर्व परीक्षांसाठी एमपीएससीने १/४ नकारात्मक गुणपद्धतीचा वापर करण्याचे ठरविले आहे. मुख्य परीक्षेसाठी पात्र होण्याकरिता आयोगाकडून किमान गुण जाहीर केले जातात. त्यालाच Cut off मार्क्स म्हणतात. ज्या विद्यार्थ्यांना या किमान गुणांपेक्षा जास्त गुण मिळतात ते विद्यार्थी मुख्यपरीक्षेसाठी पात्र ठरतात.

) मुख्यपरीक्षा – एकूणपेपर – ६ (अनिवार्य),एकूणगुण–८००

पेपर१:-या मध्ये निबंधलेखन, सारांशलेखन आणि भाषांतर हे भाग असतात. यामध्ये प्रत्येकी  ५०गुणांचे मराठी

व इंग्रजी असे दोन पेपर असून ते लेखीस्वरूपाचे (पारंपरिक/वर्णनात्मक) असतात.

पेपर२:-या मध्ये व्याकरण, आकलन इत्यादी अभ्यासक्रम असतो. पेपर२ मध्ये सुद्धा प्रत्येकी ५० गुणांचे मराठी व

इंग्रजीअसेदोनपेपरअसतात. हेपेपरवस्तुनिष्ठबहुपर्यायीस्वरूपाचेअसतात.

पेपर ३, , , :-  हे पेपर सामान्य  अध्ययनाचे असतात. या मध्ये अभ्यासाला पूर्व परीक्षेच्या पेपर १ मधील सर्व

विषय तसेच पंचायतराज, मानव संसाधन विकास व मानवाधिकार, कायदे इत्यादी विषय असतात.

प्रत्येक पेपर हा १५० गुणांचा असतो. हे चारही पेपर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी  स्वरूपाचे असतात.

पेपर २ ते ६ हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असल्यामुळे त्यांचे एकूण गुण हे १/४ नकारात्मक गुणपद्धतीने काढले जातात. मुख्यपरीक्षेतून मुलाखतीसाठी निवड होण्याकरिता विद्यार्थ्याला आयोगाने ठरवून दिलेल्या किमान गुणांएवढे किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवावे लागतात.

मुख्य परीक्षेचा सुधारित अभ्यासक्रम – https://bit.ly/3kNUy1o

) मुलाखत – एकूण गुण १००

राज्यसेवा परीक्षेतील तिसरा आणि शेवटचा टप्पा म्हणजे मुलाखत. मुलाखत ही खरं तर तुमच्या व्यक्तिमत्वाची परीक्षा  असते. यामध्ये तुमचे चारित्र्य, दृष्टिकोन,  तुमची निर्णयक्षमता इत्यादी गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं जातं. तसेच तुमचा पदवीचा विषय, आधी  करत असलेली नोकरी, चालू घडामोडी, तुमचा जिल्हा/तालुका या बाबत प्रश्न विचारले जातात.

राज्यसेवा परीक्षेचा अंतिम निकाल हा मुख्यपरीक्षा आणि मुलाखतीचे गुण एकत्र करून तयार केला जातो; म्हणजेच एकूण ९०० गुणांपैकी निकाल लावला जातो. विद्यार्थ्याला मिळालेल्या गुणांवरून त्याचा अनुक्रमांक(Rank) ठरविला जातो आणि त्या नुसार त्याला पद दिले जाते.

एमपीएससी द्वारे खालील पदांसाठी राज्यसेवा परीक्षा घेतली जाते.

Class 1 PostsClass 2 Posts
  Deputy Collector (DC) Deputy Superintendent of Police (Dy.SP) Assistant Commissioner State Tax Deputy Registrar Co-operative Societies – A Deputy Chief Executive Officer (Dy. CEO) Superintendent State Excise Department Block Development Officer (BDO – A) Finance, Audit and Accounts Services – Group A Chief Officer, Nagar Palika/Nagar Parishad – A Tahasildar  Block Development Officer – B Chief Officer, Nagar Palika/Nagar Parishad – B Mantralay Section Officer Sub – Registrar Co-operative Societies – B Taluka Inspector of Land Records ( TILR ) Deputy Superintendent State Excise Department Finance, Audits and Accounts Services – Group B Assistant Regional Transport Officer (ARTO) NayabTahasildar

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या इतर काही स्पर्धापरीक्षांबाबत आपण पुढील तक्त्यामध्ये बघु या. 

परीक्षेचेनावपरीक्षेचेस्वरूपपात्रता
दुय्य्म सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा– पोलीस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक आणि सहायक कक्ष अधिकारी या तीन पदांसाठी एकच संयुक्त पूर्वपरीक्षा घेतली जाते. परंतु प्रत्येक पदाच्या मुख्यपरीक्षेसाठी निवड होण्याकरिता Cut off वेगवेगळा लागत असतो. तसेच तीनही पदांसाठी मुख्यपरीक्षा वेगवेगळी घेतली जाते.   – पोलीस उपनिरीक्षक पदासाठी मुख्य परीक्षे नंतर स्वतंत्र शारीरिक चाचणी घेतली जाते.   – या तीनही परीक्षांना मुलाखतीचा टप्पा नसतो.१) तीन ही पदांसाठी पदवीचे शिक्षण अनिवार्य. २) पोलीस उपनिरीक्षक पदासाठी –    उंची: पुरुष- किमान १६५ सेमी महिला- किमान १५७ सेमी   पुरुषांसाठी छाती:       न फुगवता – ७९सेमी फुगवून    – ८४सेमी  
सहायक मोटारवाहन निरीक्षकपूर्वपरीक्षा-प्रश्न १००, गुण १००, वेळ – १ तास मुख्यपरीक्षा – प्रश्न १५०, गुण ३००, वेळ – २ तास   दोनही पेपर हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असतात.  मेकॅनिकल/ऑटोमोबाईल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा/पदवी पूर्ण  
अभियांत्रिकी सेवापरीक्षापूर्वपरीक्षा – प्रश्न१ ००, गुण १००, वेळ – ९० मिनिटे मराठी, इंग्रजी, सामान्य अध्ययन आणि CSAT   मुख्यपरीक्षा – पेपर१ – प्रश्न १००, गुण २००            पेपर २ – प्रश्न १००, गुण २०० अभियांत्रिकीविषयाशी निगडित अभ्यासक्रम – मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल   दोनही परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतात.   मुलाखत – ५० गुणसंबंधित अभियांत्रिकी शाखेची पदवी पूर्ण
महाराष्ट्रकृषीसेवापरीक्षापूर्वपरीक्षा – प्रश्न १००, गुण १००, वेळ – १ तास           मराठी, इंग्रजी, सामान्य अध्ययन आणि कृषी   मुख्यपरीक्षा – पेपर १ – प्रश्न १००, गुण २००, वेळ – १ तास                   कृषी-विज्ञान          पेपर २ – प्रश्न २००, गुण ४००, वेळ – २ तास कृषी अभियांत्रिकी विषयाशी निगडित   दोनही परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतात.   मुलाखत – ५० गुणकृषी/कृषीअभियांत्रिकी शाखेची पदवी पूर्ण
महाराष्ट्र वनसेवा परीक्षापूर्वपरीक्षा – प्रश्न १००, गुण १००, वेळ – १ तास           मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता चाचणी व चालू घडामोडी   मुख्यपरीक्षा – पेपर १ – प्रश्न १००, गुण २००,                   सामान्य अध्ययन            पेपर २ – प्रश्न १००, गुण २००,          सामान्य अध्ययन, पर्यावरण संरक्षण       दोनही परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतात.   मुलाखत – ५० गुणकृषी अभियांत्रिकी शाखेची पदवी किंवा खालील कोणत्याही एका विषयात पदवी पूर्ण –   Physics, Chemistry, Mathematics, Botany, Zoology, Statistics, Forensic Science, Horticulture, Veterinary or Animal Promotion

सरकारी नोकरी आणि त्यासाठी असणारी स्पर्धापरीक्षा हा समाजसेवेचा सर्वात सोपा आणि तितकाच अवघड रस्ता आहे. अवघड यासाठी कि यात तुम्हाला नोकरीची शाश्वती नाही आणि जर कोणी देत असेल तर तो तुम्हाला सरळसरळ मूर्ख बनवतोय असं समजून जायचं. स्पर्धापरीक्षेच्या शेअरमार्केटमध्ये त्यानेच गुंतवणूक करावी ज्याला ती परीक्षा आणि स्वतःची क्षमता नीट समजलीआहे. नाहीतर नेहमी तोटाच स्वीकारावा लागेल.

सर्वांना खूपखूप शुभेच्छा.