तीन भारतीय विद्यापीठांना क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2022 मध्ये TOP -200  स्थान

 

क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी 2022 रँकिंग मध्ये  आयआयटी- बॉम्बे, आयआयटी -दिल्ली, आयआयएससी बेंगलुरू – बीआयजी या तीन विद्यापीठांना अव्वल-२०० (TOP-२००) स्थान मिळाले आहे. आयआयएससी बेंगळुरू या संस्थेला संशोधनासाठी जगात पहिले  स्थान मिळाले आहे.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा अभिमानास्पद क्षण असल्याचे म्हटले असून तिन्ही विद्यापीठांचे त्यांनी अभिनंदन केले आहे तर श्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी भारत शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात प्रगती साधत असून शैक्षणिक क्षेत्रात विश्वगुरु म्हणून विकसित होत असल्याचे म्हटले आहे..

क्यूएस रँकिंग संकलित करण्यासाठी सहा निर्देशकांचा वापर करतोः शैक्षणिक प्रतिष्ठा (एआर), नियोक्ता प्रतिष्ठा (ईआर), प्रति विद्याशाखा (सीपीएफ), विद्याशाखा / विद्यार्थी गुणोत्तर, आंतरराष्ट्रीय विद्याशाखा प्रमाण आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे गुणोत्तर.

लंडनस्थित क्यूएसने ८ जून २०२१ रोजी वार्षिक जागतिक विद्यापीठ क्रमवारी सन २०२२ साठी जाहीर केली, त्यानुसार इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स- बंगळुरू हे जगातील अव्वल संशोधन विद्यापीठ आहे तर भारतीय तंत्रज्ञान संस्था, गुवाहाटी, या गटात जागतिक स्तरावर ४१ व्या क्रमांकावर आहे.

रँकिंगच्या १८ व्या आवृत्तीनुसार, क्युएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२२मध्ये आयआयटी- मुंबई ही सलग चौथ्या वर्षी  अव्वल स्थान मिळवले  आहे. परंतु ते २०२१ च्या १७२ च्या रँकमधून चार स्थानांवर घसरून १७७ वर खाली आले आहे.

आयआयटी, दिल्ली हे भारताचे दुसरे सर्वोत्कृष्ट विद्यापीठ ठरले आहे.या विद्यापीठाला १८५ वे स्थान मिळाले आहे.

आयआयटी- मद्रासने २० स्थानांची वाढ नोंदविली आहे आणि आता TOP -२५५ व्या स्थानावर आहे. आयआयटी-खडगपूर २८०  व्या स्थानावर आहे.

भारतीय विद्यापीठांनीही जागतिक स्पर्धकांच्या तुलनेत संशोधनक्षेत्रात खूपच प्रगती केली आहे.

मॅसाचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने जागतिक क्रमवारीत विक्रम केला आहे तर २००० सालानंतर  प्रथमच ऑक्सफोर्ड विद्यापीठ दुसर्‍या क्रमांकावर आहे, तर स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि केंब्रिज विद्यापीठ तिसर्‍या क्रमांकावर आहेत.

सध्या Industry ४.० हि चौथी औद्योगिक क्रांती भारतात वेग घेत आहे. या क्रांतीसाठी लागणारे शिक्षण हे या विद्यापीठात दिले जाते. या विद्यापीठांच्या यशामुळे निश्चितच या औद्योगिक क्रांतीसाठी आवश्यक उत्तम शिक्षण भारतातच मिळू शकेल असे विश्वासक वातवरण निर्माण होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.