जुही चावला यांना का  ठोटावला हायकोर्टाने २० लाखाचा दंड.

प्रसिद्ध अभिनेत्री  जुही चावला यांना नुकताच हायकोर्टाने २० लाखाचा दंड ठोटावला आहे. ५-जी मोबाईल तंत्रज्ञान हे मानवी तसे संपूर्ण जीवसृष्टीसाठी घातक असून त्याच्या भारतात होणाऱ्या चाचण्या  थांबविण्यात याव्यात अशी याचीका जुही चावला यांनी कोर्टात सादर केली होती.

 जुही चावला व काही पर्यावरणवाद्यांचे असे म्हणणे आहे की,  या तंत्रज्ञानावर हवे तेवढे संशोधन अजून पर्यंत झालेले नाही. हे संशोधन झाल्यानंतरच ५- जी च्या वापरास मान्यता द्यावी असे ह्यांचे म्हणणे आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की दगडावर जोरात ठोका टाकल्यावर दगड फुटतो परंतु रोज हळूहळू ठोका टाकत राहिल्यास सुद्धा हा दगड काही कालावधीनंतर फुटू शकतो. म्हणजे मोबाईलच्या लहरी सौम्य असल्या तरी रोज सतत ह्या लहरींमध्ये राहिल्याने याचा जीवसृष्टीवर विपरीत परिणाम होवू शकतो.

मात्र कोर्टाने जुही चावला यांची ही याचिका फेटाळून लावून ५ -जी तंत्रज्ञानाला विरोध म्हणजे देशाच्या प्रगतीला विरोध आहे. जगात आज कित्येक देशात  ५- जी तंत्रज्ञान वापरले जात असून, जुही चावलांचे हे कृत्य म्हणजे  केवळ प्रसिद्धीकरिता केलेले हे कृत्य समजून त्यांना २० लाख रुपयांचा दंड ठोटावला आहे.

खरेच या मोबाईल लहरी घातक आहेत का?

मोबाईल नेटवर्कसाठी ज्या लहरी वापरल्या  जातात त्या Non Ionic म्हणजे सौम्य लहरी वापरल्या जातात. या लहरी पृथ्वीवरील जीवसृष्टी म्हणजेच वनस्पती, पशु-पक्षी व  मानवी आरोग्याला हानिकारक नाहीत असे शास्त्रज्ञांचे मत आहे. Ionic लहरी या मात्र घातक असतात. उदा. Xray, CT scan इत्यादी. या तीव्र Ionic  लहरींमुळे मात्र मानवामध्ये जनुकीय बदल घडून कर्करोग होण्याचा धोका असतो. सध्या ४- जी तंत्रज्ञानामध्ये ज्या लहरी वापरल्या जाणार आहेत त्याच लहरी ५- जी तंत्रज्ञानात वापरल्या जाणार असल्याने याचा जीवसृष्टीवर परिणाम होणार नाही असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

काय आहे ५- जी तंत्रज्ञान?

५-जी म्हणजेच Fifth Generation ही मोबाईल नेटवर्क तंत्रज्ञानाची पाचवी पिढी आहे. हे ५-जी तंत्रज्ञान हे अगोदरच्या चारही पिढ्यांपेक्षा (१- जी, २- जी, ३- जी, ४- जी ) पेक्षा खूपच वेगवान, शक्तिवान,  असेलच पण हे तंत्रज्ञान आपण वापरत असलेल्या सर्वच वस्तू उदा. कार, फ्रीज, एसी, टीव्ही, घरातील लाईट्स इत्यादी वस्तू मोबाईलला जोडल्या जातील. अर्थात या सर्व इलेक्ट्रोनिक वस्तूंमध्ये पण ५-जी तंत्रज्ञान असणे आवश्यक आहे. तुमची कार तुम्ही मोबाईलने चालवू शकाल, जर तुम्ही घरातील एसी बंद करायचा विसरलात तर जगातून कुठूनही तो बंद करू शकाल. तुम्ही मोबाईलद्वारा  घरातील, कंपन्यांमधील बहुतांशी कामे मोबाईलद्वारा करू शकाल. मोबाईलचा डाऊनलोड करण्याचा वेग हा प्रचंड वाढणार असून काही सेकंदात एखादा सिनेमा डाऊनलोड होवू शकेल.  

५- जी तंत्रज्ञानाचा उद्योगांवर काय परिणाम होईल?

जीवनातील सर्वच क्षेत्रांमध्ये  उदा. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, हवामानशास्त्र, शेती, उद्योग, माहिती तंत्रज्ञान   इत्यादींमध्ये अमुलाग्र बदल होतील. भविष्यामध्ये जी Industry ४.० ही क्रांती होवू घातली आहे. ती ५ जी तंत्रज्ञानामुळे वेगाने होणार आहे. (Industry ४.० म्हणजे  robotics, Internet of Things, Artificial Intelligence, Big Data, Machine Learning इत्यादी ). या Industry ४.० तंत्रज्ञानामुळे बहुतांशी कामे आपोआप होणार असल्याने आता असलेल्या नोकऱ्या या राहणार नसून नवीन प्रकारची कामे तयार होवून नोकऱ्यांचे स्वरुप बदलणार आहे. त्यामुळे जे नवीन तंत्रज्ञान स्वीकारणार नाहीत त्यांना भविष्यात नोकऱ्या गमवाव्या लागण्याची शक्यता आहे. ऑनलाईनचा वापर प्रचंड वाढणार असून सर्व व्यवहार हे  ऑनलाईन होवू शकतील. शिक्षण हे सर्वव्यापी होऊन विद्यार्थांना शैक्षणिक क्षेत्र निवडायचे अथवा बदलायचे स्वातंत्र्य, शिक्षक निवडायचे स्वातंत्र्य, शैक्षणिक संस्था निवडायचे स्वातंत्र्य मिळेल. बँकांचे व्यवहार हे बँकांशिवाय होतील म्हणजेच बँकिंग असेल पण बँक कार्यालये नसतील. रुग्णालयांमध्ये बहुतेक शस्त्रक्रिया रोबोट करतील. माहिती तंत्रज्ञान ह्या क्षेत्रात काम करण्यास प्रचंड वाव मिळेल. हवामानशास्त्र अचूक होईल. उद्योगांमध्ये Internet of Things व  Artificial Intelligence चा वापर वाढेल. कंपन्या चालवायला खूप कमी माणसे लागतील.

भारतात ५- जी तंत्रज्ञान कधी सुरु होईल?

भारतात नवीन तंत्रज्ञान पोहोचायला नेहमीच वेळ लागतो. परंतु ५-जी तंत्रज्ञान त्या मानाने लवकरच म्हणजे काही महिन्यात भारतात सुरु होण्याची शक्यता आहे. शासनाने यासाठी कार्यवाही सुरु केली असून या ५-जी तंत्रज्ञानाच्या चाचण्यांना परवानगी दिली आहे. यात Reliance Jio, Bharti Airtel, Vodafone Idea and MTNL या कंपन्यांना शासनाने मान्यता दिली असून प्रथमच मुकेश अंबानींच्या जिओ या कंपनीने या क्षेत्रात आघाडी घेतली आहे. चीनच्या कंपन्यांना मात्र सरकारने ५-जी नेटवर्क क्षेत्रात प्रवेश नाकारला आहे.

लवकरच भारतात ५-जी तंत्रज्ञान सुरु होऊन देश आतापेक्षा खूप वेगवान होऊन प्रगतीकडे जाईल, परंतु तो खरेच आनंदी व सुखी असेल का हे लवकरच समजणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.