आमच्याबद्धल

नमस्कार!
आपण सर्वच आज कोविद-१९ च्या कालखंडातून संक्रमण करीत आहोत. त्यातच निसर्ग वादळाने कोकणात हाहाकार माजविला. आता पावसाने सुद्धा जरा जास्तच कहर केला आहे. या सर्व वाईट प्रसंगांना आपण सर्वच तोंड देत आहोत. कोणाचे घराचे नुकसान झाले, कोणाचे व्यवसाय ठप्प झाले आहेत, कोणाच्या नोकऱ्या गेल्या आहेत. कोकणात तर नारळी-फोफळीच्या वाड्या उध्वस्त झाल्या आहेत. कित्त्येक कॉटेजेस व छोटेमोठे रिसोर्ट वादळात वाऱ्याने अथवा झाडे पडून मोडकळीस आले आहेत. विद्यार्थीवर्ग भविष्याविषयी चिंताग्रस्त आहे. शेतकऱ्यांचा तयार शेतमाल विकला न गेल्याने तसेच दुधाचे भाव घसरल्याने त्यांचे तर अतोनात नुकसान झाले आहे. परंतु आपण सर्व धैर्याने हा मुकाबला करीत आहोत. आता मात्र आपण पुन्हा एकदा परिस्थितीला सामोरे जाण्यास सज्ज झालो आहोत. हा ब्लॉग पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून झेप घेण्यासाठी आवश्यक माहिती पुरविण्याचे काम करणार आहे. यशस्वीतांच्या गोष्टी सुद्धा सांगणार आहोत. आमची टीम शेती, व्यवसाय, नोकऱ्या, शिक्षण इत्यादीमधील योजनांची माहिती पुरविण्याचे काम करणार आहे. तसेच जुने-नवे तंत्रज्ञान, योग, आयुर्वेद, आरोग्य व चालू घडमोडी विषयक माहिती देण्याचे काम सुद्धा करणार आहोत. या माहितीचा आपणास नक्की उपयोग होईल याची खात्री आहे

संपादक

आत्मनिर्भर भारत